कुठे बरं चुकलो मी?
डॉक्टर होण्यासाठी अहोरात्र अभ्यास केला हे चुकलं ?
की
MBBS होऊनही सरकारी नोकरीत रमलो हे चुकलं?
मनापासून केलं प्रामाणिक काम तेही चुकारांच्या गर्दीत… म्हणून मी चुकलो?

की
लाच न देता बढती मिळवत गेलो
म्हणून मी चुकलो?
ना दबलो ना झुकलो पण काम करत राहिलो..
इथेच बहुदा मी चुकलो?
भरसभेत वस्त्रा समान एक एक अधिकार उतरवताना विकट हास्याने त्यांनी लाजवलं.. अपमान झाला कुणीतरी शिवीही झोडली..
ना मी पातळी सोडली ना माझी मान मोडली…
म्हणून का मी चुकलो?

माझ्या हक्काचा न्याय मिळता मिळता किती उशीर झाला…एक बरं झालं उशीरा का होईना पण एक साक्षात्कार झाला….
अरे…त्या पदांच्या लायकी पेक्षा मी किती तरी वेगळा होतो…
बहुदा या जागेसाठी मी नव्हतोच बनलो
तरीही इथे रमलो म्हणून मी चुकलो….
तरीही इथे रमलो म्हणून मी चुकलो….

सर,आपण कित्येकांसाठी प्रेरणास्रोत आहात,निराश होऊ नका.आजपर्यंत कितीतरी वादळं आपण समर्थपणे परतवून लावली आहेत. तुम्ही चुकीचे नाही याची जाणीव तुमच्या इतकीच आपल्या संपर्कात असणाऱ्या माझ्यासारख्या कित्येकांना आहे.कृपा करून चुकीच्या लोकांसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका,हताश होऊ नका.🙏🙏 “सत्यमेव जयते”….
LikeLiked by 2 people
जेव्हा आपण प्रवाहाविरुद्ध उभे राहतो तेव्हाच निम्मी लढाई जिंकलेले असतो.
LikeLiked by 2 people
शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि सत्याची वाट ही खडतर असते
LikeLiked by 2 people
Sir don’t worry we all are with u
Truth is never fail….
Satyamev Jayate !!!!!
LikeLiked by 1 person
सर आजीबात नाही ……मी कुठं चुकलो….हे म्हणायचही नाही….. आपणच बरोबर आहात …या राजकारणी लोकांचा कसला विचार करताय…. हे आज ईकडे तर उद्या तिकडे…..पण एक मात्र समाधान नक्कीच आहे …की तुम्ही पुरून उरलात सगळ्यांना…त्यांची वाहवा केली असती तर अजुन पुढे नक्कीच गेला असता…पण तुम्ही नाही चुकलात 👍👍👍👍🙏
LikeLiked by 2 people
Sirji, you are correct, nothing wrong done by you.There are some officers like you but you are rightly represented.After all the win is yours. Don’t worry. Keep writing. I always with you.👍
LikeLiked by 2 people
True
LikeLiked by 1 person
‘कुठे चुकलो’ यात आज का वाया घालवावा?आयुष्य नव्याने समजले.असे समजून नविन सुरूवात करणे कधीही योग्य, संघर्ष नसेल तर नाविन्य कसेअसणार….
LikeLiked by 1 person
Khupach chaan mandani
LikeLiked by 1 person
कधी कधी वाटत ना कि आपण चांगला माणूस बनन हा हि एक कित्यक वेळ गुन्हा आहे …..
LikeLike
बा अनिल,
ना तू कुठे चुकलास, न कि हे हताश उदगार.
ही तर एक संवेदनशीलता .
आम्हाला तुझ्या सत्या प्रती तडजोड न करण्याचा निर्भीड बाणा
खूप च भावलाय.
इतरांसाठी प्रेरणास्रोत व्हावे ह्याहून मोठी बाब कोणती?
LikeLiked by 1 person