My special thanks to Dr Hemant Chikalikar for translating my poem ‘Oh! Wuhan virus’ into Marathi

हे वुहान च्या विषाणू
ईश्वर निर्मित नव्हे,मानवाची देणगी आहेस तू
राजकारणी आणि शास्त्रज्ञ काहीही म्हणोत,
आमचा अंतरात्मा सांगतो,तू मानवाच्या पापाचं फळ आहेस.
उघडपणे बोलण्याची आमची हिंमत नाही.
राजकारण्यांच्या आणि शास्त्रज्ञांच्या विरोधात तर नाहीच नाही
त्यांनीच तर तुला आजचं अक्राळविक्राळ दिलं रूप
बेसावध जगावरचा तुझा हल्ला त्यांनीच तर केला प्रायोजित
तरीही डॉक्टर्स,मेडिकल स्टाफ,शास्त्रज्ञ, सद्सदविवेक बुद्धी जागी असलेले सर्व..
आम्ही सगळे लढलो.
बिथरलेल्या तुझ्या कर्ताकरवित्या नी तुझी बदलली अणुरेणू रचनाच
अधिक त्वेषाने तुटून पडले मानवजातीवर.
कधी डेल्टा तर कधी ओमायक्रोन चे मुखवटे चढवून
माणसं बळी पडत राहिली
वणवण भटकायला लावलस आम्हाला
कधी बेड,कधी ऑक्सीजन तर कधी व्हेंटिलेटर साठी
त्यातून उभा राहिला नवा धंदा.. लसीकरण
त्याला निमूट शरण जाण्याशिवाय नव्हता तरणोपाय.
आमच्या भयगंडा चा घेऊन फायदा
अनेक जण झाले अब्जाधीश

हे विषाणू वुहान च्या
तुझी जमात निघाली होती आम्हाला नष्ट करायला
पण झाली नाही यशस्वी
या जगावर अजुन ही ईश्वराची मायेची पाखर आहे
त्याच्या रुपात होते कोरोना योध्ये
त्यांच्या रुपात ईश्वर लढला आमच्यासाठी
तू रूपं बदललीस मायावी राक्षसा सारखी
कधी डेल्टा तर कधी ओमिक्रोन.
हे विषाणू वुहान च्या
सगळं जग तुला आठवत राहील एखाद्या भयावह स्वप्नासारखं
आमचे आप्त स्वकीय तू ओढून नेलेस डोळ्यादेखत. आता येतील लाटा मागून लाटा
तुझ्याही आणि लसींच्या ही
एक ना एक दिवस तुझी ताकद क्षीण होईल
पण हे विषाणू वुहान च्या
सगळं जग तुला आठवत राहील एखाद्या भयावह स्वप्नासारखं
आमचे आप्त स्वकीय तू ओढून नेलेस डोळ्यादेखत
तळतळाट लागतील तुला आणि तुझ्या निर्मात्या ना
हे विषाणू वुहान च्या.

Great translation….excellent Marathi
LikeLiked by 1 person
Very good,you have properly described the Wuhan virus hats off to your narration
LikeLiked by 1 person