
सालाबाद प्रमाणे या वर्षी रॉय कडे ख्रिसमस पार्टी नाही हा फार मोठा सांस्कृतिक धक्का आहे . वर्षानुवर्षे पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना अचानक वारी कॅन्सल झाल्यावर जसं वाटेल तसच काहीसं.रॉय हा माणूस नावाप्रमाणेच रॉयल .नावापुरताच ख्रिश्चन.एरवी पुरता गाववाला . ज्या सहजतेने चर्च ला जाईल,त्याच सहज पणें देव दर्शन ही घेईल .त्याच सहजपणाने दसऱ्याला जिजामाता रुग्णालयात वॉर्ड बॉय सकट सगळ्यांच्या गाड्यांना हार घालेल.यामध्ये यत्किंचितही नाटकीपणा नाही.सर्वधर्म समभाव केवळ कागदोपत्री नाही तर तो हृदयातून आलेला .दरवर्षी न चुकता त्याचा आवर्जून फोन येणार म्हणजे येणार.त्याच्या घरी सुपर क्लास वन पासून चतुर्थ श्रेणी मधले कर्मचारी त्याच मोकळेपणा ने वावरत असायचे .सर्वांची चोख व्यवस्था. खाण्या पिण्याची चंगळ.सगळ्यांची आवड निवड लक्षात ठेवून तसे प्लॅनिंग.आणि हे सगळं गेली 25- 30 वर्षे.यासाठी फक्त ऐपत असून भागत नाही, दानत ही लागते .
ख्रिसमस ची ही वारी बंद झाल्यामुळे माझी पुण्याई कमी पडली अशी माझी खंत आहे .पण त्यामुळे गेली कित्येक वर्षे अनिल ने जी निरपेक्ष मैत्री केली त्याची किंमत समजली . मित्रा,खूप खूप शुभेच्छा. ख्रिसमस निमित्ताने आपल्या मैत्री साठी .Cheers..👍

संवेदनशील व्यक्तिमत्त्व ,pcmc मध्ये आमचे देवमाणूस रॉय साहेब.शतायुषी होवो💐
LikeLiked by 1 person