बुलबुलची रोजनिशी
बऱ्याच दिवसांपासून बायकोची भुणभूण चालू होती की लवकर घर बांधू पण तिला आवडेल अशी जागा मिळत नव्हती. आज पेपर मधली जाहिरात वाचली की “बनाना रिपब्लिक” मध्ये काही जागा उपलब्ध आहेत. बायकोला जागा आवडली पण डायरेक्ट उन्हात आपली पोरं काळी होतील अशी तिला भिती वाटते.

लाईट (रात्री लागलाच तर करंबेळकर कुटुंबाच्या खिडकीतून येईल) आणि पाणी (त्यांच्या टाकीतून ओव्हरफ्लो होणारं) याची सोय आहे. शिवाय जागा ‘रोडटच’ नाहिये त्यामुळे आगंतुकांची भिती पण नाही. ( शिवाय आम्ही दोघेही पुण्याचेच!)
पण सावलीचा बंदोबस्त करावा लागेल. हिला कळत नाही का की नाहीतरी आपण काळ्या गालाचेच आहोत….. पण ऐकायची नाही. उद्या काहीतरी करावं लागेल….. बुलबुल …….. 30 एप्रिल 2022.