बुलबुल ची रोजनिशी ७
आज मला किती आनंद झालाय काय सांगू तुम्हाला ? आज आमच्या हिने पहिलं अंडं घातलं. शिवाय हिला अजिबात त्रासही झाला नाही की कुणी वैद्याला बोलवावं लागलं. आता मी बाप होणार या कल्पनेनेच मला वेड लागलंय !
आमचं मुलांच्या संगोपनाचं काम पण लगेच सुरू झालं. आम्हाला हवेत उडताना कसंही वेडंवाकडं उडावं लागतं. अशा वेळी चक्कर यायची खूप भिती असते (आमच्या शेजारच्या काकूंना तर आठ दिवस धडपणे चालता सुद्धा येत नव्हतं मध्यंतरी). तेव्हा आमच्या पिल्लांच्या vestibular apparatus ला गर्भात असतानाच अशा गोल गोल गिरक्यांची सवय व्हावी म्हणून आम्ही अंडं सतत गोल गोल फिरवत रहातो. आता या कृतीला काही तज्ञांनी ‘गर्भसंस्कार’ नाव देऊन व्यवसाय सुरू केलेला पाहिलं की हसू येतं. मला कळत नाही की आपल्या पिल्लांनी जे जन्मानंतर करायला पाहिजे ते आईने बाळ गर्भात असतानाच करायला पाहिजे यात कुठलं क्लिष्ट तंत्रज्ञान आहे ?

आज काकांना दम भरला. त्यांनी चूक तर मान्य केलीच शिवाय शक्य असेल तेव्हा तेव्हा शेजारच्या जाधवांच्या बोक्याला हुसकावून लावण्याचं पण मान्य केलं. त्यामुळे त्यांना लांबून (पण फ्लॅश विरहित) फोटो काढायची परवानगी आम्ही दिली आहे.
बुलबुल
मस्त लिहिताय डॊक्टर
LikeLiked by 1 person
Its by Dr Rajendra Karambelkar, my friend
LikeLike