बुलबुल ची रोजनिशी ९
गेले दोन दिवस आळीपाळीने मी पण हिच्या बरोबर अंड्यांवर ‘गर्भसंस्कार’ करण्यात सहभाग घेतोय आणि हिला मधून मधून आराम करायला वेळ देतोय.
माणसांमध्ये पुरुष लोक या बाबतीत अगदीच निरुपयोगी दिसतात. पिल्लू होईपर्यंत सगळे बिनकामाचे !

बुलबुल
७ एप्रिल २०२२.
आज सकाळी काका कोणाला तरी कौतुकाने आमचं घर दाखवत होते. ते सांगतच होते तेवढ्यात माझं लक्ष गेलं. माझ्या कडे बोट दाखवून सांगत होते की घरटं ‘त्या लालबुड्या’ बुलबुलचं आहे.
बुलबुल ची रोजनिशी १०
काका मला ‘लालबुड्या’ म्हणाले ? यांच्या जिभेला हाड आहे की नाही ?? असले घाणेरडे शब्द वापरून ओळख करून द्यायची ही कुठली पद्धत ???
मला त्या क्षणी एकंदरीतच सगळ्या मनुष्य जाती विषयी घृणा निर्माण झाली. अरे, तुमच्या तुमच्यात एकमेकांना काळं गोरं म्हटलं तर तुम्हाला तो वर्णभेद वाटतो. अपमान वाटतो. आणि ईथे आमचा रंग तर सोडाच आमच्या xxच्या रंगावरून आम्हाला नावं ठेवता ? आम्हा पक्षांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या रंगसंगती वरून आमची ओळख करून देणं हे किती ओंगळवाणं आणि निंदनीय आहे हे यांना कळत कसं नाही ?
पक्षा-पक्षांमधले इतर फरक तुम्हाला कळत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे.पण म्हणून काय आमच्या ××कडे पहायचं? आमच्या आमच्यात तर आम्ही एकमेकांनाही सहजच ओळखतो. मला माझी ही आणि बिबूशेटची बायको यात एक नाही दहा फरक सांगता येतील जरी तुम्हाला सारख्या दिसत असल्या तरी….

जावू दे….. बहुतेक माणसांचा मेंदू आम्हा पक्षांपेक्षा छोटा असावा.
बुलबुल
Very nice
LikeLiked by 1 person